Venkatesh Stotra in Marathi व्यंकटेश स्तोत्र हे देवीदास ऋषींनी रचलेले एक लोकप्रिय स्तोत्र आहे. या स्तोत्रा मध्ये भगवान विष्णूचा अवतार श्री वेंकटेश्वराची स्तुती केली गेली आहे. हे स्तोत्र हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली प्रार्थनांपैकी एक मानले जाते.दररोज लाखो भाविक त्याचे पठण करतात. या स्तोत्रा मधील श्लोकांमध्ये भगवान व्यंकटेश्वराचे दैवी गुण, शक्ती आणि महिमा यांचे वर्णन केले गेले आहे.या सोबत आशीर्वाद, संरक्षण आणि मोक्षासाठी प्रार्थना केली गेली आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र ॐ श्री गणेशाय नमः | श्री व्यंकटेशाय नमः || ॐ नमो जी हेरंबा | सकळादि तू प्रारंभा | आठवूनी तुझी स्वरूप शोभा | वंदन भावे करीतसे || १ || नमन माझे हंसवाहिनी | वाग्वरदे विलासिनी | ग्रंथ वदावया निरुपणी | भावार्थखाणी जयामाजी || २ || नमन माझे गुरुवर्या | प्रकाशरूपा तू स्वामिया | स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया | जेणे श्रोतया सुख वाटे || ३ || नमन माझे संतसज्जना | आणि योगिया मुनिजना | सकळ श्रोतया साधुजना | नमन माझे साष्टांगी || ४ || ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक | महादोषांसी ...