Posts

श्री हनुमान स्तुती | Shri Hanuman Stuti |

Image
  || श्री हनुमान स्तुती || महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | अनादिनाथ पूर्ण तारावयासी || असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||१|| तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे | किती भाग्य वर्णू तया अंजनीचे || तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||२|| गिळायासी जाता तया भास्करासी | तिथे राहु तो येउनी त्याजपासी || तया चंडकीर्णा मारिता तो पळाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||३|| खरा ब्रह्मचारी मनाते विचारी | म्हणोनी तया भेटला रावणारी || दयासागारू भक्तीने गौरविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||४|| सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा | धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा || गिरी आणुनी शीघ्र तो उठविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||५|| जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी | समस्तांपुढे तापसी निर्विकारी || नमू जावया लागी रे मोक्षपंथा | नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||

Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | Umbarthyavr Paul Diste भक्तिगीते

Image
    पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर ।   हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर ।  तुळजापूरचीआई भवानी दारी आली गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   पाही वळूनी दारातुनी माय माउली ।  भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी ।  सप्तशृंगीची देवी आली आता बाई गं।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल ।  माहुरगडची रेणुका ही शालूही लाल ।  लेकिला ही बघण्या आली दारी माझ्या गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  माय माउली कुलस्वामिनी दारी आली गं ।  पाऊल दिसता लोटांगण दासी घाली गं ।  कुलस्वामिनी मोहिनी राज दारी दारी आली गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण...

श्री दत्तात्रेय शरणाष्टक | Dattatreya Tav Sharanam With Lyrics दत्तात्रेया तव शरणम् | Dattatreya Tav Sharanam With Lyrics

Image
।। दत्तात्रेया तंव शरणं । दत्तनाथा तंव शरणं ।।  (Dattatreya tava sharanam) |  श्री दत्तात्रेय शरणाष्टक श्री दत्तात्रेय शरणाष्टक  Shree Dattatreya Sharanashtak |            | श्री दत्त शरणाष्टक दत्तात्रेया तव शरणम् । दत्तनाथा तव शरणम् ॥ त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम्॥१॥ शाश्वतमूर्ते तव शरणम् । श्यामसुंदरा तव शरणम् ॥ शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरु तव शरणम् ॥२॥ षड्भुजमूर्ते तव शरणम् । षड्भुजयतिवर तव शरणम्॥ दंडकमंडलु गदापद्मकर शंखचक्रघर तवं शरणम् ॥३॥ करुणानिधे तव शरणम् । करुणासागर तव शरणम् ॥ श्रीपादश्रीवल्लभ गुरुवर नृसिंहसरस्वति तव शरणम्॥४॥ श्रीगुरुनाथा तव शरणम् । सद्गुरुनाथा तव शरणम् ॥ कृष्णासंगमतरुवरवासी भक्तावत्सला तव शरणम् ॥५॥ कृपामूर्तें तव शरणम् । कृपासागरा तव शरणम् ॥ कृपाकटाक्षा कृपावलोकना कृपानिधे प्रभु तव शरणम्॥६॥ कालांतका तव शरणम् । कालनाशका तव शरणम् ॥ पूर्णानंदा पूर्णपरेशा पुराणपुरुषा तव शरणम् ॥७॥ जगदीशा तव शरणम् । जगन्नाथा तव शरणम् ॥ जगत्पालका जगदाधीशा जगदुद्धारा तव शरणम् ॥८॥ अखिलांतरा तव शरणम् । अखिलैश्वर...

नित्य पठनीय गीता जी के 5 श्लोक - 5 Shalok Of Gita Ji for Daily Recitation 1) वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् 2) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः 3) परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् 4) नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः 5) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन

Image
 नित्य पठनीय गीता जी के 5 श्लोक -  5 Shalok Of Gita Ji for Daily Recitation   https://www.youtube.com/channel/UCHhfCNHMyRXfOX4XqB7zrKQ/  गीता जी के नित्य-पठनीय 5 श्लोक | Nitya Pathaniya 5 Shloks of Shrimad Bhagavad Gita नित्य पठनीय गीता जी के 5 श्लोक - 1) वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥  2) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥  3) परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥  4) नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥  5) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥

घोरकष्टोद्धरण स्तोत्र Ghorkashtodharan Stotra with Lyrics

Image
 Ghorkashtodharan stotra listen 11 times | ghorkashtodharan stotra in marathi | datta ghorkashtodharan stotra  घोरकष्टोद्धरण स्तोत्र 108 Times |  Ghorkasthodharan Stotra With Lyrics slow  घोरकष्टोद्धरण स्तोत्र  Ghorkashtodharan Stotra with Lyrics  Ghoratkashta Stotra DattatreyaStotram #GhorkashtodharanStotra  घोरकष्टोद्धरण स्तोत्र  Ghorkashtodharan Stotra with Lyrics

|| सद्गुरुं क्षमाष्टक || कशाला दिला जन्म तेही कळेना | करावे परी काय तेही सुचेना ||

Image
  || सद्गुरुं क्षमाष्टक || कशाला दिला जन्म तेही कळेना | करावे परी काय तेही सुचेना || जावो न जीवन परी माझे वाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||१|| दुरी तुजहूनी राहिलो सांग मी का | फुका जीवनी जाहल्या कैक चुका || आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||२|| सदा अंतरी या असे नाम तुझे | कळू दे मला सत्य कर्तव्य माझे || तुझ्या थोर कृपे पळो दूर माया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||३|| सदा सज्जनांशी जुळो नाती गोती | कधी दुर्जनांच्या नको गाठी भेटी || आता यापुढे तूच धर माथी छाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||४|| मिळे त्यात माझे समाधान व्हावे | परी त्यातुनी दान धर्मास जावे || प्रपंचात परमार्थी शिकवी रमाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||५|| जरी नाशिवंत असे देह माझा | परी त्याच देही सदा वास तुझा || मला बुद्धी दे गुण तुझेच गाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||६|| पिता आणि माता सखा बंधू माझा | मला पूर्ण आधार एक तुझा || सदा संकटी धाव तू सावराया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||७|| त्रैमुर्तीच्या राहो मी चिंतनात | रम...

🔴 हनुमानजयंती विशेष हनुमानाचा स्वरचित पाळणा #Hanuman_Jayanti Hanumanacha Palana

Image
हनुमानजयंती  विशेष हनुमानाचा स्वरचित  पाळणा  #Hanuman_Jayanti Hanumanacha Palana   हनुमानाचे पाच असे मंत्र ज्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि नकारात्मकता संपेल #5hanumaanmantras