Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | Umbarthyavr Paul Diste भक्तिगीते


 

 

पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

 हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर । 

 हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर । 

तुळजापूरचीआई भवानी दारी आली गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

 पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

 पाही वळूनी दारातुनी माय माउली । 

भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी । 

सप्तशृंगीची देवी आली आता बाई गं। 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।

 उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

 रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल । 

माहुरगडची रेणुका ही शालूही लाल । 

लेकिला ही बघण्या आली दारी माझ्या गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।

 माय माउली कुलस्वामिनी दारी आली गं । 

पाऊल दिसता लोटांगण दासी घाली गं । 

कुलस्वामिनी मोहिनी राज दारी दारी आली गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। 

पैंजणाचा नाद आला गोड कानी गं । 

उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।

पैंजणाचा नाद आला गोड कानी गं

 | Painjanacha Naad Ala God Kani ga #नवरात्री

Comments

Popular posts from this blog

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त | Swapnat Ale Mazya Gurudev Datta lyrics |

श्रीगुरुदत्ता जयभगवंता।Shri Gurudatta Jai Bhagawanta lyrics | Karunatripadi Part 2 |

आज लक्ष्मी हो चरण दाखवी | लक्ष्मी माता आरती | Aaj Lakshmi Ho Charan Dakhavi lyrics | Laxmi Mata Aarti | गौराई आरती | महालक्ष्मी (गौरी) आरती