स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त | Swapnat Ale Mazya Gurudev Datta lyrics |

 


 

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

त्याचा लागे ना अंत

त्याचा लागे ना अंत

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  || 

Ratrandivsa deva tumchi murti dhyanata

Ratrandivsa deva tumchi murti dhyanata

Tyacha lage na anta 

Tyacha lage na anta 

Swapnat ale mazya gurudev datta  

 

दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात

अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात 

दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात

अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात

दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात 

दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात 

त्याचा लागे ना अंत 

त्याचा लागे ना अंत 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त  

 

भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत

रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात

भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत

रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात

कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त

कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त

त्याचा लागे ना अंत

त्याचा लागे ना अंत

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त || २ || 


श्वानांची फौज होती त्यांच्या संगत

श्वानांना भाकर टाकत होते भगवंत 

श्वानांची फौज होती त्यांच्या संगत

श्वानांना भाकर टाकत होते भगवंत

बघा बघा ते अत्रीनंदन आले भजनात

बघा बघा ते अत्रीनंदन आले भजनात

त्याचा लागे ना अंत

त्याचा लागे ना अंत

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त || ३ || 

 


 

 

भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत

खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात

भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत

खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात

गुरुदेव दत्त मंत्र ठेवा, ठेवा ध्यानात

गुरुदेव दत्त मंत्र ठेवा, ठेवा ध्यानात

त्याचा लागे ना अंत

त्याचा लागे ना अंत

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त || ४ |


रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

त्याचा लागे ना अंत 

त्याचा लागे ना अंत 

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त

 

Ratrandivsa deva tumchi murti dhyanata

Tyacha lage na anta 

Tyacha lage na anta 

Swapnat ale mazya gurudev datta  

Swapnat ale mazya gurudev datta   


 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीगुरुदत्ता जयभगवंता।Shri Gurudatta Jai Bhagawanta lyrics | Karunatripadi Part 2 |

आज लक्ष्मी हो चरण दाखवी | लक्ष्मी माता आरती | Aaj Lakshmi Ho Charan Dakhavi lyrics | Laxmi Mata Aarti | गौराई आरती | महालक्ष्मी (गौरी) आरती