Posts

Showing posts from December, 2023

khandobachi Tali Aarti | खंडोबाची तळी आरती | tali bhandar aarti | तळी उचलायची आरती | तळी भंडार आरती

Image
 #13-12-2023 #18-12-2023-चंपाषष्ठी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात.  श्री मल्हारी मार्तंड आणि मणी - मल्ल दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले. ते षडरात्र म्हणून साजरे केले जाते. सहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणी मल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शु. षष्ठी दिवशी मल्हारी मार्तंड देवलिंग रूपाने प्रकट झाले तोच हा चंपाषष्ठीचा दिवस !      चंपाषष्ठीचे दिवशी पुजा, अभिषेक आदी विधी करून घट उठविले जातात. पुरणपोळी, वांगे-भरीत रोडगा, कांद्याची पात यांचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. घरा-घरात दिवटी पाजळली जाते व तळी भंडारही केला जातो. सर्व आसमंत सोनेरी भंडाऱ्याने उजळून निघतो. भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या भोळ्या शंकराच्या मल्हारी मार्तंड रुपाच्या  नाम गजरात सर्व आसमंत उजळून निघतो. येळकोट येळकोट ..जय मल्हार... सदानंदाचा ...येळकोट खंडोबाचे नवरात्र व चंपाषष्ठी सविस्तर माहिती पद्धती, पुजा व नैवेद्य  जय मल्हार Khandoba  Navratra https://youtu.be/u1Aa74N