Shri Ganesh Chalisa | श्री गणेश चालीसा |
Shreemant Dagdusheth Halwai Ganapati Ganesh Chalisa विविध गणेश ग्रंथांचा अभ्यास करताना श्रीगणपति चालीसा' गवसली आहे. महामुनि वसिष्ठानी राजा दशरथाच्या यज्ञासाठी याचा उपयोग केला होता. स्वसरंक्षण तसेच अभेद्य-कवच ह्यामुळे निर्माण होते, लाभ होतो, धनप्राप्ती होते, सुख समृद्धीचा लाभ होतो. महामुनि मुद्गल म्हणतात दर दिवशी ४१ वेळा अशा तन्हेने ४१ दिवस, चालीसाचे पठण केले की शत्रूचा विनाश होतो. धन, धान्य, यश, बुद्धी, समृध्दी व पुत्र-प्राप्ती होते. दररोज २१ वेळा अशा तन्हेने २१ दिवस पठण केले तर विध्नांचा नाश होऊन यश मिळते. दररोज ११ वेळा अशा त-हेने ११ दिवस पठण केले तर इच्छित मनोरथ पूर्ण होतात. श्री गणेशार्पणमस्तु ।।