।। श्री गजानन महाराज अष्टक।। Shree Gajanan Maharaj Ashtak lyrics | Gajanan Maharaj Prakat Din 2024 | Gani Gan Ganat Bote Mantra Meaning 'गणी गण गणात बोते' मंत्राचा अर्थ | गणी गण गणांत बोते | गजानन महाराज मंत्र - १०८ वेळा gan gan ganat bote |
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशीव अवघें हरी दुरीत तेंवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविणे आम्हा आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।। निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करीं । तुझी पतितपावना भटकलों वृथा भूवरी । विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वासरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।। अलास जगी लावण्या परतुनी सु-वाटे जन । समर्थ गुरूराज ज्या भुषवी नाम नारायण ।। म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।। क्षणांत जल आणिलें नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा । क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।। अगाध करणी तुझी गुरूवरा ! न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे । कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।। समर्थस्वरूपप्रती धरूनी साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरीं । हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ...