।। श्री गजानन महाराज अष्टक।। Shree Gajanan Maharaj Ashtak lyrics | Gajanan Maharaj Prakat Din 2024 | Gani Gan Ganat Bote Mantra Meaning 'गणी गण गणात बोते' मंत्राचा अर्थ | गणी गण गणांत बोते | गजानन महाराज मंत्र - १०८ वेळा gan gan ganat bote |
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशीव अवघें हरी दुरीत तेंवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविणे आम्हा आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करीं ।
तुझी पतितपावना भटकलों वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वासरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगी लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवी नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिलें नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
अगाध करणी तुझी गुरूवरा ! न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
समर्थस्वरूपप्रती धरूनी साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरीं ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
सछिद्र नौकेप्रती त्वदिंय पाय हे लागतां ।
जलांत बुडता तरी तिजसि नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
Comments
Post a Comment