Posts

Showing posts from October, 2024

Painjanacha Naad Aala God Kani Ga | पैंजणाचा नाद आला गोड कानी गं | Umbarthyavr Paul Diste भक्तिगीते

Image
    पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   हिरवा रंग अति खुलवी खुलावी सुंदर ।   हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर ।  तुळजापूरचीआई भवानी दारी आली गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   पाही वळूनी दारातुनी माय माउली ।  भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी ।  सप्तशृंगीची देवी आली आता बाई गं।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।   रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबुल ।  माहुरगडची रेणुका ही शालूही लाल ।  लेकिला ही बघण्या आली दारी माझ्या गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  माय माउली कुलस्वामिनी दारी आली गं ।  पाऊल दिसता लोटांगण दासी घाली गं ।  कुलस्वामिनी मोहिनी राज दारी दारी आली गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।।  पैंजणाचा नाद आला गोड कानी गं ।  उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गं ।। पैंजणाचा नाद आला गोड कानी गं  | Painjanacha Naad Ala God Kani ga #नव