Posts

Shri Swami Samarth Stavan | श्री स्वामी समर्थ स्तवन | Shri swami samarth aarti

Image
नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता | प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ || नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ || नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ || कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी | यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ || कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ || कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही | अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ || भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ || प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत | रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ || || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||  

krishna shloka | कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्ष: स्थले कौस्तुभम् । नासाग्रे नव मौक्तिकं करतले वेणुं करे कंकणम् ॥

Image
कस्तूरी तिलकं ललाट प टले वक्ष : स्थले कौस्तुभ म् । नासाग्रे नव मौक्तिकं करतले वेणु ं करे कंकण म् ॥ सर्वांगे हरिचन्दनं च कलयं कण्ठे च मुक्तावली । गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि : ॥ हिन्दी मे अर्थ   माथे पर कस्तूरी (कस्तूरी) के पवित्र चिह्न और छाती पर कौस्तुभ रत्न से विभूषित गोपाल को नमस्कार है, उनकी नाक एक चमकदार मोती से सुशोभित है, उनके हाथों की हथेलियों में एक बांसुरी है, उनके हाथ कंकणों से सुशोभित हैं, उनके पूरे शरीर पर चंदन का लेप लगा हुआ है, और उनकी सुंदर गर्दन मोतियों के हार से सुशोभित है, गोपीयो से घिरे हे गोपालों के मुकुट-मणि , आप उन गोपियों को मोक्ष देते हैं जो आपकी सेवा करती हैं आप की जय-जयकार हैं । 

#Akshaya_Tritiya | अक्षय तृतीयेचे महत्व सांगणारा श्लोक | पूजा कशी करावी | विष्णू, देवी लक्ष्मी आणि कुबेर मंत्र | Akshaya tritiya 2023 akshaya tritiya puja vidhi अक्षय तृतीया तारीख 2023 | Om Namo Bhagwate Vasudevay 108 , ॐ नमो भगवते वासुदेवाय Chant

Image
 अक्षय तृतीयेचे महत्व सांगणारा श्लोक  "न माधव समो मासो न कृतेन युगं समम् ।   न च वेद समं शास्त्रं न तीर्थ गंगयां समम् ।।"  अर्थ-  वैशाखासारखा महिना नाही, सत्ययुगासारखे युग नाही, वेदांसारखा धर्मग्रंथ नाही आणि गंगेसारखे तीर्थ नाही. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेसारखी कोणतीही तिथी नाही. अक्षय तृतीया (शनिवार, 22 एप्रिल, 2023) हा हिंदू आणि जैन समुदायांसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे. हा सर्वात शुभ दिवस मानला जात असल्याने, या दिवशी केलेले सर्व कार्य (आध्यात्मिक किंवा भौतिक) इच्छित परिणाम देतात. विशेषत: ध्यान, योग, जप, धर्मग्रंथ वाचणे आणि यासारख्या आध्यात्मिक  गोष्टींसाठी  हा शुभ मुहूर्त मानला जातो. उद्या दि. २२ एप्रिल रोजी अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास...

श्री स्वामी समर्थ स्तोत्र Shree Swami Samarth Stotra श्रीअक्कलकोट स्वामी समर्थांचे स्तोत्र महात्म्य

Image
  श्रीअक्कलकोट स्वामी समर्थांचे  स्तोत्र महात्म्य   श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्तोत्र महात्म्य चे नित्य नियमाने श्रवण-पठण केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.सलग 21 दिवस हे स्तोत्र पठाण केल्यास भाविक कोणत्याही संकटातून मुक्त होतात असा अनुभव आहे .स्वामी भक्तांनी हे स्तोत्र नित्य श्रवण करावे. समस्या अडचणींनी ग्रासलेले असाल तर हे स्तोत्र सलग 21 दिवस ऐका आणि नक्कीच तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. हे स्तोत्र म्हणल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव दिसून येईल.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीवर प्रत्येक स्वामी भक्ताचा विश्वास आहे आणि अनेक स्वामी भक्तांना याचा अनुभव देखील आलेला आहे. स्वामी आपल्याबरोबर आहे अशी भावना प्रत्येक भक्ताच्या मनात असते त्यामुळे तो कुठल्याही समस्या-अडचणी आल्या तरी घाबरून न जाता स्वामींच्या चरणी लीन होतो. स्वामी आपल्या भक्ताची आईप्रमाणे काळजी घेतात.अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र दररोज वाचावे किंवा ऐकावे.अपेक्षापूर्तीसाठी सलग 21 दिवस हे स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे.  प्रत्येक गुरुवारी हे स्तोत्र आवर्जून वाचावे किंवा ऐकावे. श्री स्वामी समर्थ ...

HANUMAN AARTI | हनुमान आरती | #हनुमानजयंती | Maruti aarti | मारुती आरती

Image
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||   जय देव जय देव जय श्रीहनुमंता तुमचेनी प्रसादें न भीयें कृतांता ||धृ|| दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मनिला खेद | कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद | रामी रामदास शक्तीचा शोध ||2||   जय देव जय देव जय श्रीहनुमंता || तुमचेनी प्रसादें न भीयें कृतांता ||धृ|| -श्री रामदास स्वामी

Most powerful shloka of Ram | #ram navmi special# Shriram ram rameti rame rame manorame, sahastra nam tattulayam ram naam varanane | श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ #30march2023

Image
रामाचा  सर्वात शक्तिशाली श्लोक  Most powerful shloka of Ram श्रीरामरक्षेतील तसेच विष्णुसहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी श्लोक आज आपण म्हणणार आहोत. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥ देवी पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेहे भगवान ,अशी कोणती सोपी आणि जलद पद्धत आहे की ज्याद्वारे लोक दररोज भगवान विष्णूच्या हजार नामांचे पठण करू शकतील? तसे असल्यास, मला त्याबद्दल ऐकायचे आहे. तेव्हा भगवान शंकरांनी उत्तर दिले, रामनाम उच्चारणे हे हजार विष्णूनाम जप करण्यासारखे आहे. श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे ।  सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ॥   shree Ram Ram Rameti - 108 Times  श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे ।  सहस्रनाम तत्तुल्यं, श्री राम-नाम वरानने ॥  अर्थ — पार्वती जी से भगवान शिव कहते हैं - श्रीराम नाम के मुख में विराजमान होने से सुन्दर पार्वति। राम, राम, राम इसी द्वादशाक्षर नाम का जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति इन तीनों अवस्थाओं में जप करो। हे पार्वति! मैं भी इन्हीं मनोरम राम...

komal vacha de re ram lyrics | कोमळ वाचा दे रे राम | श्रीराम जय राम जय जय राम |#shreeram #ram_navmi_special #30march2023

Image
  कोमल वाचा दे रे राम कोमळ वाचा दे रे राम।  विमळ करणी दे रे राम।।धृ।।   प्रसंग ओळखी दे रे राम।  धुर्तकळा मज दे रे राम।।१।। हितकारक दे रे राम।  जनसुखकारक दे रे राम।।२।। अंतरपारखी दे रे राम।  बहुजनमैत्री दे रे राम।।३।। विद्यावैभव दे रे राम।  उदासीनता दे रे राम।।४।। मागो नेणे दे रे राम।  मज न कळे ते दे रे राम।।५।। तुझी आवडी दे रे राम।  दास म्हणे मज दे रे राम।।६।। संगीत गायन दे रे राम ।  अलाप गोडी दे रे राम।।धृ।। धातामाता दे रे राम।  अनेक धाटी दे रे राम।।१।। रसाळ मुद्रा दे रे राम।   जाड कथा मज दे रे राम।।२।। दस्तक टाळी दे रे राम। नृत्यकला मज दे रे राम।।३।। प्रबंध सरळी दे रे राम।  शब्द मनोहर दे रे राम।।४।। सावधपण मज दे रे राम। बहुत पाठांतर दे रे राम।।५।। दास म्हणे रे सदगुण धाम।  उत्तम गुण मज दे रे राम।।६।। पावन भिक्षा दे रे राम।  दीनदयाळा दे रे राम।।धृ।। अभेद भक्ती दे रे राम।  आत्मनिवेदन दे रे राम।।१।। तद्रुपता मज दे रे राम।  अर्थारो...