गणपतीचे श्लोक १ . नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे 2 .प्रारंभी विनती करू गणपती 3. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका ४ . प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे।
माथा शेंदुर पाझरे वरि वरे दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे।
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||
Netri Don Hire Prakash Pasare Atyant Te Sajire
Matha Shendur Pazare Vari Vare Durvankurache Ture
Maze Chitta Vire Manorath Pure Dekhoni Chinta Hare
Gosavi Sut Vasudev Kavi Re Tya Moryala Smare
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ ||
नारदमुनींनी रचलेले गणपती स्तोत्र
या स्तोत्रांमधे गणपतीची बारा नावे दिली आहेत.
श्री गणपती स्तोत्र हे नारद मुनि यांनी तयार केला आहे. व त्याचा अनुवाद हा श्रीधर स्वामी यांनी केला आहे.
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||जपता गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
नारदमुनींनी रचलेले श्री गणपती स्तोत्र संस्कृतमध्ये
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।१।।
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
Comments
Post a Comment