पितृ अष्टक | Pitru Ashtak lyrics in marathi | Pitru Ashtak Stotra in marathi |

पितृ अष्टक मराठीत 

pitru ashtak stotra in marathi

पितृदोष निवारण उपाय

जर तुमच्या पितृदेवता प्रसन्न असतील तरच तुम्हाला इतर देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात. 

पितरांच्या कृपेशिवाय कष्ट करूनही जीवनात अस्थिरता येते, कष्टाचे योग्य फळ मिळत नाही.

१)पितरांना मुक्ती मिळवून देणार असे हे पितृ अष्टक नक्की ऐका.

२)हे स्तोत्र ऐकल्याने पितृदोष निवारण होते व पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

३)पितरांचे आशिर्वाद प्राप्त होतात.

४)पितृपक्षात रोज 2 मिनिट वेळ काढून ऐका पितृ अष्टक  होईल पितृदोष निवारण.

५)जरी सर्व अमावस्या महत्त्वाच्या असल्या तरी सोमवार आणि शनिवारी येणार्‍या अमावस्या विशेषत: पवित्र मानल्या जातात. याशिवाय मौनी अमावस्या आणि सर्वपित्री दोष अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे सर्व अमावस्यांना विशेषतः

सर्वपित्री अमावस्येला (sarvapitri amavasya) सुख शांतीसाठी ऐका हे पितृ अष्टक.

६)श्राद्धाचे दिवशी नक्की एकदा ऐका पितृ अष्टक पितर होतील प्रसन्न दोष होतील दूर.

७) पितृपंधरवडयात रोज ऐक हे आठ श्लोकाचे पितृअष्टक


 
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||

इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

मिळो सद्गती मज पितरांना
विनंती ही माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
 
जोडून कर हे विनंती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||

करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
 
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ ||
 
 pitru ashtak #pitruashtak

pitru ashtak, pitru stuti, #sarvapitri_amavasya

#पितृ अष्टक

#pitruashtak 

#सर्वपित्री अमावस्या #पितृअष्टक #pitruashtak

#पितृपक्ष

#Pitru_paksha  

#पितृपक्ष

#पितृअष्टकमराठी

#pitruashtakstotrainmarathi #pitrustotramarathi


pitru ashtak 

पितृपक्ष

Pitru ashtak 

#pitrupaksha2023

#भरणीश्राद्ध

#पितृअष्टक

#pitruashtakinmarathi

#pitrupaksha2022

पितृपक्ष रोज ऐकावे असे सुरेल आवाजातील अप्रतिम

#पितृ श्राद्ध

पितृअष्टक 

#pitruashtak ,  

Pitru ashtak marath

पितृ अष्टक

पितृ अष्टक

 Pitru Ashtak 

 

 

Comments

Popular posts from this blog

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त | Swapnat Ale Mazya Gurudev Datta lyrics |

श्रीगुरुदत्ता जयभगवंता।Shri Gurudatta Jai Bhagawanta lyrics | Karunatripadi Part 2 |

आज लक्ष्मी हो चरण दाखवी | लक्ष्मी माता आरती | Aaj Lakshmi Ho Charan Dakhavi lyrics | Laxmi Mata Aarti | गौराई आरती | महालक्ष्मी (गौरी) आरती