"गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!" मराठीत #9 april 2024 Gudi Chi Aarti |आरती गुढीची |गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी |gudichi arti|#gudipadwa2024 Gudicha mantra गुडी पाडवा स्टेटस

 

Gudicha mantra

सुदीन आला,
शुभारंभ जाहला,
नवं वर्षाचा हा पहिला दिवस आला,
 उभारावी प्रत्येकांनी घरावर गुढी, अशीच पुढं पुढं न्यावी,
आपली रूढी,
जपावे मांगल्य,
पावित्र्य नांदेल घरी, आशा या पावन दिशी,
पूजा या मंत्राने गुढी
 .....
"गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!"


 
 
 

Gudichi Aarti 

सुदीन आला,
शुभारंभ जाहला,
नवं वर्षाचा हा पहिला दिवस आला,
 उभारावी प्रत्येकांनी घरावर गुढी, अशीच पुढं पुढं न्यावी,
आपली रूढी,
जपावे मांगल्य,
पावित्र्य नांदेल घरी, आशा या पावन दिशी,
म्हणा ही गुढीची मंगलमय आरती.....
"गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!"


Gudi Chi Aarti |आरती गुढीची |गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी |gudichi arti|#gudipadwa2024

गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती|
 
विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती|
 
माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध आणिक  पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती|
 
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती|
 
पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती|
 
नाशिकच्या जेष्ठ पुरोहिता सौ स्मिता आपटे द्वारे लिखित

 

Comments

Popular posts from this blog

स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त | Swapnat Ale Mazya Gurudev Datta lyrics |

श्रीगुरुदत्ता जयभगवंता।Shri Gurudatta Jai Bhagawanta lyrics | Karunatripadi Part 2 |

आज लक्ष्मी हो चरण दाखवी | लक्ष्मी माता आरती | Aaj Lakshmi Ho Charan Dakhavi lyrics | Laxmi Mata Aarti | गौराई आरती | महालक्ष्मी (गौरी) आरती